Saturday, March 31, 2012

Feature_Army Chief, Anaa and Common Man

आर्मीचीफ, अण्णा आणि आम्ही!

केंद्र सरकारचं बॅडलक खराब दिसतयं. घोटाळ्यांचे जंजाळ वाढत असतानाच अण्णा व त्यांचे सहकारी आणि आर्मीचीफ यांनी अडचणीत टाकणा-या विषयांना हात घातला आहे. संसदेतल्या विरोधकांपेक्षा बाहेरचे विरोधक वाढत चालल्याचे चित्र आहे. आम्ही मात्र ‘कॉमन मॅन’ सारखे नुसतेच बघतोय.... झालचं तर तोंडाची वाफ जाळून सरकारच्या नावाने बोटं मोडतोय... बातम्या, लेख, चर्चा यांनी वातावरण तापलयं... प्रश्न समजलाय फक्त उत्तर सापडत नाही; अशी स्थिती आहे.

Thursday, March 10, 2011

Feature_Indian Foreign Policy on Egypt-Lybia

भारताने इजिप्त-लिबियाच्या मैदानात उतरावे!
आधी ट्युनिशिया मग इजिप्त, आता लिबिया... भूमध्य सागर आणि लाल समुद्राजवळ असलेल्या आफ्रिकेतील भूभागात सत्ता-यांविरुद्ध बंड सुरू आहे. तेल वाहतूक आणि तेल व्यापाराशी संबंधित देश, त्यांच्या भोवतालचे छोटे देश... सगळीकडे राजकीय अस्थिरता निर्माण होत आहे. जगातला सगळ्यात मोठा लोकशाहीप्रधान देश अर्थात आपला भारत या परिस्थितीत नेमकी काय भूमिका घेणार?

Friday, February 18, 2011

Feature_No Tension Only Cricket

टेन्शन खल्लास, क्रिकेट सुरू !
सार्क परिषदेत एखाद्या मुद्द्यावर सहजासहजी एकमत होणार नाही पण क्रिकेट वर्ल्ड कपचे आयोजन म्हटल्यावर सगळच कसं सुरळीत चाललेलं दिसतय. भारत, बांगलादेश आणि श्रीलंका हे तीन भिन्न संस्कृतीचे देश हातात हात धरुन एकत्र उभे राहिलेत. प्रत्येक भारतीयाला तर वानखेडेवर ढोणी वर्ल्ड कप स्वीकारतोय असे स्वप्न पडू लागलेय.

Tuesday, October 5, 2010

Features_Army is not require on all fronts

जिथे तिथे लष्कर हवे कशाला?
आपल्या लष्कराचे नक्की काम काय? सीमेबाहेरून येणा-या शत्रुपासून देशाचे रक्षण करायचे की देशांतर्गत भानगडी मिटवायच्या? जगातील मोठी लोकशाही म्हणवणा-या आपल्या देशाला ही सवय विनाशाकडे नेणारी आहे.

Friday, March 26, 2010

Features_Ram Janmabhoomi_Ayodhya

अयोध्येतील रामभेटीची कहाणी
देशातल्या अन्य राम मंदिरात जसे दर्शनाचे समाधान मिळते तसे या जन्मभूमीत कुठेच मिळाले नाही. स्वतःच्याच जन्मभूमीत बंदिस्त झालेल्या रामाला भेटून मी दोन-तीन सेकंदातच तिथून पुढे गेलो. पण जाणवत नव्हते ते मंदिराचे पावित्र्य. मनात होते अनेक प्रश्न.

Wednesday, January 27, 2010

Features_My experience about UP

भय्यांच्या राज्यात
या भय्यांना पुन्हा युपी-बिहारला हकलून दिले पाहिजे... असे थेट टोकाचे 'राज'कारण आपल्या महाराष्ट्रात तापले असताना त्याच भय्यांच्या राज्यात जाण्याचा योग आला.

Wednesday, November 18, 2009

Features_Free Phone Services_Internet Telephony

फुकटात फोनफोनी
टेलिफोन, मोबाइलमुळे काम कशी झटपट होतात, चटकन निरोप देता येतो. आता हीच सेवा कुणी फुकटात देत असेल तर..